सोलापूर, दिनांक 9(जिमाका):- सिध्देश्वर यात्रा महोत्सवानिमित्त सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने शहातील देशी, विदेशी ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.
महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम मधील कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी आदेश जारी केले असून, दि.14 जानेवारी रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत. दि.15 जानेवारी रोजी सायंकाळी 7.00 वाजलेनंतर व दि.16 जानेवारी 2024 सायंकाळी 5.00 वाजलेनंतर शहरातील देशी, विदेशी ताडी विक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद ठेवावेत. तसेच आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.