सोलापूरच्या शेतकऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता ! दिलीप माने यांनी आशीर्वाद यांचे केले कौतुक
सोलापूर : दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील ई-पीक नोंदी न झालेल्या शेतकयांनाही अनुदान मिळणे या विषयासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकयांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत करण्याचे निर्णय घेतले आहे. राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकयांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप/पोर्टलव्दारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यकरीता पात्र राहणार आहेत. मात्र शेतकयांनी ई-पीकांची नोंदणी न केलेले दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचीत राहिले आहेत.
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील ई-पीक नोंदणी न केलेले मात्र शेतीमधील पिकांचे झालेल्या नुकसानीचा विचार करुन या अनुदानापासून वंचीत सर्व शेतकयांना अनुदान मिळण्याची विनंती केली.
तसेच
पंतप्रधान पिक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक पीक विमा अर्ज भरलेल्या अल्प शेतकयांना पीक विम्याची रक्कम अदा झालेली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्रातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकयांचाही समावेश आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुमारे 54715 शेतकयांची खरीप हंगाम 2023-24 मध्ये पीक विमा अर्ज भरला होता. पीक विमा कंपन्याकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले होते. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील फक्त 917 शेतकयांना पिक विमा प्राप्त झाला आहे. तर इतर 80 टक्के शेतकरी अद्याप पीक विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत.
तसचे 2023 मध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी सरकारकडून नुकसान भरपाई मंजूर करुन त्याचे वितरण सुरू करण्यात आले. मात्र अद्यापही या दोन्ही तालुक्यातील सुमारे 20 टक्के शेतकयांना आधार प्रामाणीकरण होऊन तसेच व्हि.के. नं. (Vk no.) प्राप्त झालेला असतानाही नुकसान भरपाई प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुमारे 10 टक्के शेतकयांचे आधार प्रमाणिकरण व व्हि.के. नं. (Vk no.) येणे प्रक्रिया झाले नसल्याने अश्या शेतकयांनाही पैसे मिळाले नाहीत.
दरम्यान बैठकीनंतर माहिती देताना दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाल्या प्रकरणी समाधान व्यक्त करताना शेतकऱ्यांबाबत असलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक केले.