बंजारा समाजाची स्वाती मोहन राठोडने मिळवले यूपीएससी परीक्षेत यश ; देशात या रँकने पास
स्वाती मोहन राठोड (रहाणार सोलापूर) ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन यूपीएससी परीक्षेत 492 रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
स्वाती ही लहानपणापासूनच जिद्दी,हुशार व होतकरू असल्याने, कबाड कष्ट करून,भाजी विकून,आई वडिलांनी तिला शिकवले, स्वातीने आपल्या घराची परिस्थितीची व आई वडिलांची मेहनत याची जाणीव ठेऊन रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळवून दाखविले.
स्वातीने मेहुणे राजू चव्हाण महानगरपालिकेत कामाला असून त्यांनी सुद्धा स्वातीला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केले. स्वातीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना व शिक्षक वर्ग तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व स्नेही मंडळी यांना दिले आहे. स्वातीच्या यशाने शुभेच्छांचा वर्षाव सर्व समाज बांधवांकडून व मित्रमंडळी कडून होत आहे.
स्वाती मोहन राठोड या बंजारा भगिनींनी UPSC परीक्षेत 492 रँकसह उत्तीर्ण झाल्याबद्दल सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व आधार ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे सर्वेसर्वा युवराज राठोड यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि पुढच्या प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.