सोलापूर शिवजन्मोत्सव मध्यवर्तीच्या उत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार, कार्याध्यक्ष रवी मोहिते तर खजिनदार सुशील बंदपट्टे ; बैठकीत झाले हे आवाहन
सोलापूर : शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक रविवारी संपन्न झाली या बैठकीत यंदाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. 2024 शिवजन्मोत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार यांची निवड झाली कार्याध्यक्षपदावर रवी मोहिते यांना संधी देण्यात आले असून खजिनदार पदावर सुशील बंदपट्टे यांची निवड करण्यात आली.
बैठकीसाठी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, माजी उत्सव अध्यक्ष मतीन बागवान, दिलीप कोल्हे, जयकुमार माने, श्रीकांत घाडगे, अमोल शिंदे, शिवचरित्रकार शिवरत्न शेटे, राजन जाधव, माऊली पवार, श्रीकांत डांगे, मनीष देशमुख, सुनील रसाळे, प्रताप चव्हाण, विनोद भोसले, गणेश डोंगरे, महेश धाराशिवकर, लहू गायकवाड, राम जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.
बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजनेने करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष मतीन बागवान आणि ट्रस्टीच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले. तदनंतर सुनील कामाठी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर बैठकीमध्ये राजन जाधव यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी प्रक्रिया राबवताना इच्छुकांनी तसेच सूचकांनी नावे सुचवावीत असे आवाहन केल्यानंतर उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार यापदांसाठी विविध नावे सुचवण्यात येऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
दरम्यान बैठकीमध्ये विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरा करण्यावर आवाहन केले तसेच शिवचरित्र शिवरत्न शेटे यांनी देखील डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरा करण्याची सूचना केली.
या बैठकीत पुढील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या…
उपाध्यक्ष अर्जुन शिवशिंगवाले, अंबादास सपकाळे, दिलीप बंदपटे, नागेश यलमेळी, मनिषा नलावडे, महिला सेक्रेटरी लता ढेरे, सह सेक्रेटरी सचिन तिकटे, सह खजिनदार गणेश माळी, मिरवणूक प्रमूख महेश धाराशिवकर, उप मिरवणूक प्रमूख नामदेव पवार, कुस्ती प्रमूख बापू जाधव, अमर दुधाळ, प्रसिध्दी प्रमूख वैभव गंगणे, बसू कोळी.