देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्यांदा केला नक्षलग्रस्त गडचिरोलीत मुक्काम ; राज्यभरातून होतंय फडणवीसांचे कौतुक
उपमुख्यमंत्री झाल्यापासून नव्या सरकारच्या काळात 16 महिन्यात 7 वा गडचिरोली दौरा केला आहे. गडचिरोलीत सकाळपासून कामाला लागले आहेत, पहाटे 6.45 वाजता मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवली, उत्साही युवकांसोबत ते मॅरेथॉन मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
गडचिरोलीत मुक्काम करणारे महाराष्ट्राचे पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा आतापर्यंत दोन वेळा मुक्काम केला आहे. गृहमंत्री म्हणून पोलिस दलाच्या पाठिशी ठाम संदेश त्यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यापासून नव्या सरकारच्या काळात 16 महिन्यात सातवा गडचिरोली दौरा आहे.
आज वांगेतुरीत नागरिकांना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. गेल्यावर्षी या भागात दोन पोलिस ठाणे सुरु केली. येथून 11 कि.मी. अंतरावर नक्षल्यांचे आश्रयस्थान आहे. 15 ऑगस्ट 2023 ला त्यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन केले. तेव्हा पिंपळी बुर्गी येथे भेट देणारे ते राज्याच्या इतिहासातील पहिले गृहमंत्री किंवा राजकीय नेते ठरले होते. हा भाग इतका संवेदनशील की तेथे कोणताही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आजवर गेले नव्हते.