दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व ८३ गावचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
सोलापूर : ग्रामीण भागात सर्वांचे लक्ष लागलेल्या सरपंच पदाचे अखेर आरक्षण सोडत काढण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 83 गावचे आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन सभागृहात उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आले. सुरुवातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग शेवटी सर्वसाधारण प्रवर्गाची आरक्षण सोडत झाली.
दक्षिण तालुक्यात मुळेगाव व सांजवाड ही गावे अनुसूचित जमाती सर्वसाधारण तर होणमुर्गी व राजूर हे गावे अनुसूचित जमाती महिला साठी राखीव झाली आहेत.
83 गावच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत खालील प्रमाणे असून यातील गडद अक्षरात लिहिलेल्या गावचे आरक्षण महिलांसाठी राखीव आहेत.