ब्रेकिंग : दक्षिणच्या होटगी स्टेशन सरपंच विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन गावचे सरपंच जगन्नाथ शिवाजी गायकवाड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. होटगी स्टेशन ग्रामपंचायतच्या दहा पैकी आठ सदस्यांनी एकत्र येऊन तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे शुक्रवारी दुपारी दाखल केला.
सरपंच जगन्नाथ शिवाजी गायकवाड यांच्या विरुद्ध तहसीलदार यांच्याकडे दाखल केलेल्या प्रस्तावावर सुभाष रामचंद्र पाटोळे, निसार अहमद कांबळे, गायत्री कुणाल ठक्के, नीलम लक्ष्मण भोसले, मीना घनश्याम पोरे, जिजाबाई अशोक धायगोडे, फातिमा बंदगी नदाफ, मोहनबी मलंग शेख या आठ ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.
येत्या 27 मार्च 2025 रोजी दुपारी बारा वाजता होटगी स्टेशन ग्रामपंचायत मध्ये तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
१.सरपंच होटगी स्टेशन हे ग्रामपंचायतीचा कारभार करताना आम्हा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत.
२. सरपंच होटगी स्टेशन हे ग्रामपंचायतीचे कामामध्ये हयगय कसूर करत आहेत.
३. सरपंच होटगी स्टेशन हे ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पध्दतीने करत आहेत.
४. सरपंच होटगी स्टेशन हे ग्रामपंचायतीच्या ठरावाप्रमाणे अंमलबजावणीत कामामध्ये कुचराई करतात.
५. सरपंच होटगी स्टेशन हे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये सलोखा ठेवून दैनंदिन पारदर्शी कारभार करत नाहीत.