लय भारी ! सोमनाथ वैद्य यांच्याकडून 112 युवक – युवतींना मिळाली रोजगाराची संधी
सोलापूर : स्वयंम शिक्षा फाउंडेशनच्या उद्योग मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यास प्रतिसाद मिळाला. यावेळी एकूण 400 पैकी 112 युवक – युवतींना रोजगाराची संधी मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शासनाच्या विविध आठ आर्थिक विकास महामंडळाचे अर्ज भरून घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंतीचे औचित्य साधून स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ऍड. सोमनाथ वैद्य यांच्या वतीने आज बुधवारी सकाळी 11 ते 4 यावेळेत सोलापुरातील जुळे सोलापुरातील मयूर क्लासिक मल्टिपर्पज हॉल येथे युवक – युवतींसाठी मोफत उद्योग मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास युवक – युवतींचा चांगला प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक समाजकल्याण आयुक्त सुलोचना सोनवणे ,
उद्योजक कुमार करजगी, प्रवचनकार
बसवराज शास्त्री , प्रा. राहुल उपाध्ये, प्रा. अरुण गायकवाड, व्हीव्हीपी कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. राहुल गायकवाड, अमरावतीच्या अग्निपंख फाऊंडेशनचे सचिव विक्रमसिंग मगर, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे , कौशल्यविकास प्रशिक्षक अमित कामतकर , प्रा. शैलेश थिगले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या मेळाव्यात विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर मान्यवरांचनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. या मेळाव्यात शासनाच्या विविध आठ आर्थिक विकास महामंडळ आणि सोलापुरातील 11 विविध संस्थांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर न्यू एज कॉम्प्युटर कौसल्य विकास केंद्र, महाराष्ट्र कॉम्प्युटर, गणेश बिल्डर्स, गुरुकुल कॉम्प्युटर्स, जिजाऊ महिला मंच, साकव फाउंडेशन,
डी. एस. कमळे कॉम्प्युटर या संस्थांनी महिला व युवकांना रोजगाराची संधी दिली. या मेळाव्यात सुमारे 400 युवक युतीने सहभाग नोंदवला. त्यापैकी 112 जणांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
विविध योजनांचा लाभ देण्यासाठी
प्रयत्न करणार : ॲड. सोमनाथ वैद्य
या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले होते. यावेळी उद्योग उभारणीसाठी युवक युतीकडून विविध महामंडळा अंतर्गत योजनांसाठी अर्ज भरून घेण्यात आले. लवकरच त्यांना विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, नवीन स्टार्टअपसाठी स्वयंम शिक्षा फाउंडेशनच्या वतीने विशेष मदत मिळणार आहे, असे संयोजक ऍड. सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केले.
उपस्थित सर्व युवक – युवतींनी
व्यक्त केले समाधान
युवकांना विविध कंपनीत रोजगार मिळून देण्यासाठी सर्वंकष विकासाचे व्हिजन असलेले ऍड. सोमनाथ वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे. या उद्योग मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यात महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
युवक – युवतींना विविध आवडीचे उद्योग सुरू करण्यासाठी व रोजगार मिळविण्यासाठी यातून प्रेरणा मिळाली. स्वयंम शिक्षा फाउंडेशनच्या वतीने संस्थापक ॲड. सोमनाथ वैद्य यांच्या पुढाकारातून हे यशस्वी झाले. याबद्दल उपस्थित सर्व युवक – युवतींनी समाधान व्यक्त केले. ॲड. वैद्य यांचे आभार मानले.