हा कार्यक्रम सत्काराचा होता की निधी मागणीचा हेच कोणाला समजले नाही. पालकमंत्र्यांचे सर्वच नेत्यांनी एवढं कौतुक केलं की भरणे मामा यांना नाही म्हणताच आलेच नाही. राजन पाटील यांनी आपल्या भाषणात पालकमंत्र्यांना चिमटे काढले काका साठे म्हणजे गाडीचे असं चाकं आहे की त्याला कायम वंगन करावं लागतं जर हे चाक घसरले की केवळ उत्तर तालुक्यावर नाही तर जिल्ह्यात परिणाम होतात असे सांगून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्याचबरोबर अनगर नगरपंचायत नव्याने झाली आहे त्यासाठी भरणे मामांनी निधी दिल्याचं सांगितलं मात्र त्याचा आकडा पालकमंत्र्यांनी आपल्या तोंडून सांगावा असे ते सांगून गेले.
पालकमंत्री भरणेमामा यांनी आपल्या भाषणात अनगर नगरपंचायतला माजी आमदार राजन मालकांच्या वाढदिवसादिवशी आपण फोन करून एक कोटी निधी डीपीसी मधून दिल्याचे सांगत वाढदिवसाची गिफ्ट दिली. मात्र एवढ्याने थांबणार ते राजन मालक कसले? शेवटी अजून दोन कोटीचा निधी त्यांनी याच कार्यक्रमात पालकमंत्री म्हणून जाहीर केला हे सांगताच राजन पाटलांनी उठून पालकमंत्र्यांसमोर हात जोडून वंदन केले. अजून निधी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सोलापूरातील सर्वच कार्यक्रमात भरणेमामा एकच ट्यून लावतात तशीच त्यांनी वडाळ्यात पण ऐकवली, मी पालकमंत्री म्हणून खूप साधासरळ माणूस आहे, मला साधी माणसं आवडतात, तुम्ही मला ओळखले नाही, मी अजूनही पोत्यावर बसतो, मला समजून घ्या सर्वांना मी सांभाळून घेतो असे म्हणून स्वतः पालकमंत्र्यांनी सर्वांसमोर हात जोडले तो किस्सा काय होता पहा या व्हिडीओ मधून

















