सोलापूर झेडपीची ही संघटना कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेमध्ये विलीन
सोलापूर दि. महाराष्ट्र राज्य जि प वाहन चालक संघटना सोलापूर या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह वाहनचालक यांनी कास्ट्राईब जि प कर्मचारी संघटनेमध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे लेखी पत्र संघटनेस दिलेले असून, त्यानुसार कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या सांगली येथे पार पडलेल्या विभागीय मेळाव्यामध्ये वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर कोळी, सचिव दीपक चव्हाण यांच्यासह सर्व वाहन चालक यांना संघटनेत प्रवेश दिल्याचे कास्ट्राईब महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी यांनी सांगली येथील संघटनेच्या विभागीय मेळाव्यात जाहीर केले.
वाहन चालक संघटनेचे भीमाशंकर कोळी, दीपक चव्हाण यांचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मडावी, महासचिव सुरेश तांबे वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, उपाध्यक्ष गिरीश जाधव यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वाहन चालक यांच्या वेतन त्रुटी, अन्यायकारक बदल्या, प्रतिनियुक्त्या, विश्राम कक्ष ,खाजगी वाहन चालक भरती यासह अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आली असून, याबाबत लवकरच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे राज्याचे कार्याध्यक्ष गणेश मडावी व राज्याचे वाहन चालक संघटनेचे मिरजकर यांनी सांगितले.
याप्रसंगी सोलापूर कास्ट्राइब महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे, जि प शाखेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, भगवान चव्हाण, कल्याण श्रावस्ती ,मकरंद बनसोडे, चंद्रकांत होळकर, नागनाथ धोत्रे तर वाहन चालक संघटनेचे विलास पाटील, शहानवाज शेख विजय हराळे ,दीपक चव्हाण उदय सोनकांबळे, कैलास लोकरे जितेंद्र शिर्के, बंडू आगवणे सुभाष माळगे, पंडित इंगोले, शाम लांडगे, बाळासाहेब भाले, महादेव फुगे, राजू राठोड, यासीन यादगिर, श्रीशैल काळे, अशिफ वांगीकर, अल्ताफ लालसंगी, बंडू आगवणे जाधव आदी सह वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.