इशाधीन शेळकंदे कृषि मंत्र्यांचे तर दादासाहेब कांबळे ग्रामविकास मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांची बदली झाली असून त्यांची राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.
शेळकंदे यांच्यासोबतच सोलापूर जिल्ह्याचे तात्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 30 एप्रिल 2025 रोजी या आदेश काढले आहेत.
शेळकंदे यांना ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तब्बल सव्वा तीन वर्ष होऊन अधिक कार्यकाळ झाला होता त्यामुळे ते बदलीला पात्र होते. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीत वेळी त्यांची गटविकास अधिकारी पदावर बदली झाली होती परंतु मॅटमध्ये जाऊन त्यांनी बदलीला स्टे आणला होता.
