सोलापूर जिल्हा परिषदेत छ्त्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर ; शिवगीतांनी स्फुल्लिंग जागवले !
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या विचारांचा जागर झाला यावेळी गायलेल्या शिव गीतांमधून उपस्थितांचे पुल्लिंग चेतले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने स्वानंद प्रस्तुत गर्जा महाराष्ट्र माझा या शिवगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीची पूजा करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे, उप शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, कार्यकारी अभियंता पार्सेकर, समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांची उपस्थिती होती.
सीईओ आव्हाळे म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचे प्रत्येक विचार हे स्फूर्तीदायी आहेत, ते विचार आचरणात आणून महाराष्ट्र राज्याला आणखी वैभवशाली करण्याची जबाबदारी आपली आहे. असे सांगत शिवरायांवरील रचना त्यांनी वाचून दाखवली.
यावेळी स्वानंद टीचर च्या ग्रुपने शिवचरित्रावर वेगवेगळे गीते सादर करून स्फुल्लिंग चेतले. सर्वांना भगवे फेटे बांधण्यात आल्यामुळे वातावरण निर्मिती झाली. जय शिवाजी जय भवानी अशा घोषणाने वातावरण दुमदुमून गेले.
प्रारंभी मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखाध्यक्ष अविनाश गोडसे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली.