सोलापूर तुळजापूर मार्ग सोमवार रात्रीपासून चार दिवस बंद ; पोलीस प्रशासनाने दिले हे पर्यायी मार्ग
सोलापूर : दिनांक १६/१०/२०२४ रोजी कोजागिरी पोर्णिमा व दिनांक १७/१०/२०२४ रोजी मंदीर पोर्णिमेनिमित्त श्री. तुळजाभवानी मातेच्या दर्शना करीता मोठ्या प्रमाणात भाविक सोलापूरहून तुळजापूर कडे पायी चालत जात असतात. सदर मार्गावर जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांमुळे पायी दर्शनाकरीता तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना अडथळा, गैरसोय व अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास प्रतिबंध करण्याकरीता खालील मार्गावर वाहनांना प्रतिबंध करण्यात आले आहे.
दिनांक १४/१०/२०२४ रोजीचे रात्रौ ००:०१ वा. पासून ते दिनांक १७/१०/२०२४ रोजीचे रात्रौ २४:०० वा. पर्यंत खालील नमूद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात येत असून पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग सुद्धा दिले आहेत.