सोलापूरच्या या तीन मतदारसंघात तिसरी आघाडी मुस्लिम उमेदवार देणार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन झालेल्या राजू शेट्टी, बच्चू कडू आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीने सोलापूरच्या पाच जागा लढविण्यात येणार आहेत.
प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक अजित कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यामध्ये आमदार बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजी राजे या तीन नेत्यांची तिसरी आघाडी स्थापन झाली आहे. त्या आघाडीच्या माध्यमातून सोलापुरातील दक्षिण, मध्य, अक्कलकोट, करमाळा आणि माढा अशा पाच जागा लढवणार असल्याचे सांगताना या ठिकाणी प्रामुख्याने मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी केल्याची सांगितले. पहा नक्की काय म्हणाले कुलकर्णी.