यंदा प्रथमच निघणार पारंपरिक वेशभूषेत महिलांची बाईक रॅली ; असा साजरा होणार शिवजन्मोत्सव सोहळा
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पाळणा कार्यक्रम संदर्भात डाळींबी आड शिंदे चौक येथे बैठक पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून बैठकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक महिलांनी वेगवेगळ्या सूचना मांडल्या. तर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी महिलांची बाईक रॅली संदर्भात सूचना मांडली, यावेळी सर्वांनी एकमताने सूचना मंजूर केली.
यंदाच्या वर्षी 16 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता पहिल्यांदाच महिलांची पारंपरिक वेशभूशेत बाईक रॅली निघणार आहे. उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या महिलांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. यावेळी जनजगृती फलक महिलांच्या हातात असणार असून, जास्तीत जास्त महिलांनी या बाईक रॅली मध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून करण्यात आले आहे.
तसेच पाळणा कार्यक्रम हा अतिशय मोठया प्रमाणात होणार असून सर्व महिलांनी या पाळणा कार्यक्रमास सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, पुरुषोत्तम बरडे, लता ढेरे, सुनंदा साळुंखे, लता फुटाणे, मनीषा नलावडे, विजया काकडे, प्राजक्ता बागल, निर्मला शेळवने, सुनीता गरड, माधुरी चव्हाण, स्मिता घुले, दीपाली भोसले, उज्वला साळुंखे, यशोदा डेंगळे, जयश्री पवार, मोहिनी चटके, उत्तरा बचुटे, अर्चना बरडे, सुवर्णा यादव, प्रतीक्षा चव्हाण, जया रणदिवे, ऐश्वर्या गायकवाड, मंदाकिनी तोडकरी, प्रगती डोंगरे, शुभांगी चराटे,
वैष्णवी सुरवसे, मनीषा माने, सारिका फुटाणे यांच्यासह महिला, तसेच शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.