‘शहर मध्य’ मिळण्यासाठी मास्तर आग्रही ;
काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातांच्या बैठकीत काय घडले
सोलापूर – 18 व्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतले व भाजपचा पराभव करणे कामी भरीव योगदान दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत जागा वाटप बैठकीत माकप ला सामावून घेतले जाईल. माकप च्या प्रस्तावावर चर्चा होईल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ३१ऑगस्ट रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे पक्षाचे महाराष्ट्र नेते बाळासाहेब थोरात यांची सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लि. अमृतनगर संगमनेर येथील विश्रामगृहात भेट घेतली.
भेटीदरम्यान बाळासाहेब थोरात यांनी माकपच्या शिष्टमंडळात आलेल्या सर्वांचे भरभरून स्वागत करत सत्कार केले.
या प्रतिनिधी मंडळात डॉ.उदय नारकर, नरसय्या आडम(मास्तर), डॉ. डी.एल.कराड, डॉ.अजित नवले आदींची उपस्थिती होती.
आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत एक तास सांगोपांग चर्चा केली.
माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या सोलापूर – शहर मध्य, ठाणे – डहाणू -तलासरी, विक्रमगड शहापूर, नाशिक – नाशिक पश्चिम, कळवन, दिंडोरी, इगतपुरी, अहमदनगर – अकोले, बीड – माजलगाव , परभणी – पाथरी, नांदेड – किनवट या 12 विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली. यासंबंधीचे एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आले.