सोलापुरात संभाजी ब्रिगेड आक्रमक ; मटके फोडत केला महापालिकेचा निषेध
सोलापूर शहर तसेच हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड महिला आघाडी प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने मटके फोडून ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला.
महापालिकांना दिलेल्या निवेदनात, सोलापुर शहरात व हद्दवाढ भागामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजना अभावी पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून शहरात व हद्दवाढ भागात स्वागत नगर, देसाई नगर, समाधान नगर, जुळे सोलापूर आदींसह विविध भागत पाण्याच्या अनियमितपणामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून या परिसरात पाच-सहा दिवसा आड रात्री बे रात्री करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
महानगरपालिका नागरिकाकडून 365 दिवसाचे पाणीपट्टी आकारणी करते व प्रत्यक्ष 90 दिवसाचे पाणीपुरवठा करते त्यामुळे जेवढे दिवस पाणी तेवढेच बिल आकारणी करावी अनेक भागात अंतर्गत जलवाहिनी चार इंची असल्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होतो काही भागात असलेले हातपंप नादुरुस्त झाल्यामुळे बंद आहेत तर काही भागात नव्याने हातपंप बसवणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास, महानगर अध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हाध्यक्ष वकील आघाडी गणेश कदम, अरविंद शेळके, प्रशांत देशमुख, सिद्धराम सावळे दिलीप निंबाळकर सतीश बावरे रमेश चव्हाण, प्रशांत भंडारे, अथर्व धोत्रे, रमेश भंडारे, तेजस शेळके, महेश भंडारे, सचिन होनमाने, फिरोज सय्यद, रमेश चव्हाण, राजेंद्र माने, संजीवनी सलबत्ते, जयश्री जाधव,माधुरी चव्हाण, मनिषा कोळी, सुनीता घंटे,मैनाबाई साळुंके,सुनीता साळुंखे,नीलम पाटील,श्वेता कुलकर्णी,शुभांगी कुलकर्णी, भारती गुन्नाल, जया भुजंग,अन्नपूर्णा पाटील,मीना पाटील,ताराबाई कोकाटे,गौरी दिवाणजी,रेणुका जाधव,वैशाली डिगे,सुनीता नागटिळक,सुजाता घाटगे,शोभा देसाई,भाग्यश्री,वाघमोडे,सुनंदा सूर्यवंशी,सुनीता कारंडे,बंडे आजी,शिवम्मा चलगेरी, रुक्मिणी चिल्लाल हे उपस्थित होते.