सोलापूरचे पत्रकार हरिश्चंद्र कदम यांना पितृशोक
सोलापूर :- कर्देहळ्ळी (ता.दक्षिण सोलापूर) येथील वारकरी सांप्रदायातील मच्छिंद्र भीमराव कदम (वय 88) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उदया गुरुवार दि.४ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या कर्देहळ्ळी येथील शेतातील राहत्या घरापासून निघणार आहे.
सोलापुरातील दिवाणी व फौजदारी वकील राम कदम आणि पत्रकार हरिभाऊ कदम यांचे ते वडील होते.



















