सोलापूर : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात एक महत्वाचे संस्था मानले जात असलेल्या जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळवली.
त्यांचे सर्वच्या सर्व 16 उमेदवार मोठ्या फरकाने विजय झाले या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते नुकतेच जिल्ह्याचे नेतृत्व आलेल्या मारण्याचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे आणि माजी मंत्री दिलीप सोपल. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या साथीने हा विजय आणखीच सोपा झाला.
सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांच्या तिऱ्हे इथल्या फार्महाऊसवर झालेल्या सर्वात पहिल्या बैठकीला ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे ,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख व ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक हे दोन्ही नेते एकत्रित बसून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा दूध संघाची व्यवस्थित मोट बांधत होते त्यांच्या निधनाने जिल्ह्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून निघावी हा या बैठकी मागचा उद्देश होता. आगामी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा दूध संघाची निवडणूक ही एकत्रितपणे येऊन लढवायची तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी करून या माध्यमातून सर्व निवडणुका लढवायच्या असे या बैठकीत निश्चित झाले.
मात्र या सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणे आणि समन्वय ठेवण्यासाठी ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे आणि ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप सोपल या दोन नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली.
यानंतर निमगाव इथल्या फार्महाऊसवर झालेल्या बैठकीला मात्र आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार संजयमामा शिंदे यांची उपस्थिती ही या निवडणुकीत दूध संघाची सत्ता ताब्यात घेण्याची नांदी ठरली. काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांचाही सर्वाना एक करण्यात मोठा वाटा आहे. संजयमामा व प्रशांतमालकांनी व्यवस्थित रित्या बबनदादा व सोपल यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध फिल्डिंग लावली. मोहोळचे नेते राजन पाटील यांची 47 मध्ये वाढल्याने ही निवडणूक अजून सोपी झाली.
दादा व साहेब असल्याने करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल त्यासुद्धा सहभागी झाल्या. आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान अवताडे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनीही या निवडणुकीत जादा हस्तक्षेप केला नाही. बबनराव शिंदे व दिलीप सोपल यांनी शासकीय विश्रामगृहावर दोन वेळा बैठका घेऊन सर्व नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणला.
त्यामुळेच जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यात सत्ताधारी यशस्वी झाले. या ज्येष्ठ नेतृत्वात पहिला विजय मिळाला. भविष्यात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अशाच पद्धतीने समन्वय आणि समविचारी नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास निश्चित जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे चित्र आता दिसू लागलं आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असताना दिलीप सोपल शिवसेनेत गेले त्याांनी विधानसभा लढवली आणि त्यांचा पराभव झाला त्यानंतर राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आली त्यामुळे दिलीप सोपल जिल्ह्याच्या राजकारणापासून काहीसे दूर गेल्याचं दिसून आलं मात्र बबनदादा यांच्यासह सोपल यांच्याावर जिल्ह्याच्या नेतृत्वाची जबाबदारी आल्याने तेे पुन्हा चर्चेत आले आहेत.

















