सोलापूरच्या नरेंद्रचे योगदान मुंबईच्या देवेंद्र यांनी विसरू नये !
सोलापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले विरोधी पक्षाचा विरोधी पक्ष नेता सुद्धा होऊ नये एवढ्या जागा निवडून आल्या. या यशामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अजित पवार या प्रमुख नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे.
या नेत्यांसोबतच या तीनही पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तितक्याच ताकतीने या निवडणुकीत लढला. या यशामध्ये सर्वांचेच श्रेय आहे.
एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूरचे वातावरण पाहताना भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक अवघड होती सोलापूर शहरातील दोन्ही जागा जातील का? अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यातच शहर माध्यम हा मतदार संघ सुद्धा भाजपने आपल्याकडे सोडवून घेतला.
या एकूणच यशामध्ये सोलापूर शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा फार मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळाले. त्यांना शहरातल्या तीनही विधानसभा मतदारसंघात लक्ष देणे गरजेचे होते. दक्षिण विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजातून बंडखोरी केलेले श्रीशैल मामा हत्तुरे यांचा अर्ज काढण्यासाठी वेळ प्रसंगी माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांना मध्यस्थी करून त्यांचा अर्ज काढून घेण्यात नरेंद्र काळे हे यशस्वी झाले तसेच माजी महापौर राजेश काळे, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली यांची ही माघार घेण्यामध्ये काळे यांचे योगदान होते हे सर्व समन्वय त्यांनी घडवून आणला.
तसेच यंदा पहिल्यांदाच शहर मध्य मध्ये भाजपने उमेदवारी घेतली त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. विशेष करून पद्मशाली समाजातील काही नेते नाराज होते त्यांची नाराजी घालून त्यांच्या गाठीभेटी घालून त्यांना ही माघार घेण्यात काळे यांनी भाग पाडले. विजयकुमार देशमुख यांच्याही प्रचार यंत्रणेत नरेंद्र काळे यांचा रोल अतिशय महत्त्वाचा ठरला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाला सोडत बंडखोरी केली त्यांची ही बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आले असते परंतु सोलापूरच्या दुसऱ्या नेत्याने यात लक्ष घातले नाही अन्यथा बनशेट्टी या आज भाजपमध्ये दिसल्या असत्या.