सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी MIM च्या इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा
सोलापुरात एम आय एम पक्ष कुणासोबत ही युती करणार नाही. जेव्हा आम्ही महाविकास आघाडी कडे युतीसाठी हात पुढे करतो तेव्हा ते सहकार्य करत नाहीत. जेव्हा त्याचा पराभव होतो तेव्हा ते युतीसाठी हात पुढे करतात असे सांगताना पण महापालिका निवडणूक बाबत स्थानिक नेते निर्णय घेतील. पूर्ण ताकदीने एम आय एम महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहोत. मागील काही वर्षापासून पक्षाची ताकद वाढली आहे ती या निवडणुकीत दाखवून देऊ अशी भूमिका त्यांनी मांडली.
इम्तियाज जलील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहराध्यक्ष फारुक शाब्दी, निरीक्षक अन्वर सादात, शौकत पठाण, अजहर हुंडेकरी उपस्थित होते.
सोलापूर महापालिका जबाबदार ; एमआयएम अध्यक्ष इम्तियाज जलील यांचा आरोप
एखादी घटना किती वाईट असू शकते हे MIDC येथील परिस्थिती बघितल्यावर दिसून येते. सोलापूर महापालिका याला जबाबदार आहे, अशा भागात सुविधा ठेवण्याची जबाबदारी त्यांची होती. उलट कारखानदार यांच्यावर गुन्हा दाखल करणे कितपत योग्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. या भागात बरेच बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. मग आठवड्याला पॉकेट मिळते की महिन्याला असा आरोप सुद्धा त्यांनी केला.
महापालिका फायर ब्रिगेड विभाग सुद्धा तुटपुंजा आहे. क्रिमिनल मर्डर सारखी घटना असून याला महापालिका कर्मचारी जबाबदार असल्याचे दिसून येते.