
खासदार प्रणिती शिंदेंची सिंहासन कार्यालयाला भेट ; या शब्दात दिल्या शुभेच्छा
सोलापूर : सोलापूर डिजिटल मीडियातील लोकप्रिय झालेल्या सिंहासन या न्यूज चॅनेलच्या कार्यालयाला सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज सोमवारी सदिच्छा भेट दिली.
यावेळी संपादक प्रशांत कटारे, सौ. मनीषा कटारे, पांडुरंग सुरते, सौ अनिता अमोल गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.
खासदार शिंदे यांनी कार्यालयाची पाहणी करत सिंहासन च्या बातम्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खासदार ताई आपल्या कार्यालयात आल्याने त्यांच्यासोबत प्रणिती कटारे, मनीषा कटारे, प्रणाली सुरते, आदिती गायकवाड आदींना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. ताईंचा ऑटोग्राफ मुलांनी घेतला.

