सोलापूर लोकसभेची मतदानाची फायनल आकडेवारी आली समोर ; पहा किती टक्के झाले मतदान
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील सोलापूर मतदारसंघाची फायनल आणि निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यालयाकडून अधिकृत आकडेवारी आले असून सोलापुरात 59.19 टक्के मतदान झाले आहे. सुरुवातीला दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा मतदान करण्यात आघाडीवर होता मात्र अधिकृत फायनल आकडेवारी आल्यानंतर मोहोळ तालुका आणि त्या खालोखाल अक्कलकोट तालुका मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी संपन्न झाले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन रात्री आठ वाजता सकाळी सात ते साधारण साडेपाच पर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 57 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली होती तसेच त्यांनी आणखी दोन टक्के मतदान वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्यानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघात 59.19 टक्के इतके मतदान झाले आहे.
मोहोळ 63.15
अक्कलकोट 59.17
पंढरपूर 59.04
दक्षिण सोलापूर 58.28
उत्तर सोलापूर 59.15
शहर मध्य 56.51