सोलापूर लोकसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल ; उमेदवाराला अपेक्षा, भाजपचा उमेदवार मीच होणार
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी चडचन येथील रहिवासी व्यंकटेश महास्वामी यांनी अर्ज भरला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचीप्रक्रिया सुरू झाली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल झाला, दीपक ऊर्फ व्यंकटेश महास्वामी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला,भाजप कडून उमेदवारी मिळेल हि आशा असून सोलापुरातल उद्योग धंदे वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे व्यंकटेश महास्वामी म्हणाले.