मोहन निंबाळकरांचा पायगुण ; निवडणूक लागली, सोलापूर बाजार समिती साठी 27 एप्रिल रोजी मतदान
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा घोळ कायम असतानाच पंधरा दिवसांपूर्वीच प्रशासक पदावरून उचल बांगडी केलेले मोहन निंबाळकर यांनी गुरुवारी पुन्हा पदभार घेतला आणि त्यांचा पायगुण असा की लगेच त्याच दिवशी बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रोग्राम सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड हे हा निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे प्रसिद्ध करतील.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी बाजार समितीची निवडणूक लागली होती तेव्हा दिवस अर्ज विक्री आणि स्वीकृतीचा झाला होता त्याच दिवशी निवडणूक स्थगित करण्यात आली होती त्यामुळे आता उरलेले चार दिवस म्हणजेच 25 मार्च ते 28 मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीचा कार्यक्रम आहे. एक एप्रिल 2025 रोजी अर्ज छाननी होणार आहे. दोन एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
17 एप्रिल 2025 रोजी कधी प्रसिद्ध केली जाणार असून 27 एप्रिल 2025 रोजी बाजार समितीसाठी मतदान घेतले जाणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे मतमोजणीचे स्थळ निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक किरण गायकवाड हे निश्चित करतील.