सोलापूर बाजार समितीसाठी 429 जणांचे 469 अर्ज ; मंगळवारी या ठिकाणी होणार उमेदवारी अर्जांची छाननी
सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून 133 जणांनी अर्ज दाखल केले, सहकारी संस्था महिला राखी मधून 28, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मधून 24, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती 34, ग्रामपंचायत सर्वसाधारण 106, ग्रामपंचायत अनुसूचित जाती 32, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल 20, व्यापारी प्रतिनिधी 38, हमाल तोलार प्रतिनिधी 14 असे एकूण 469 जणांनी 429 अर्ज दाखल केले आहेत.
या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी तब्बल 270 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जाची छाननी ही मंगळवार एक एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हैदराबाद रोडवरील वि.गु. शिवदारे सभागृहात होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक तथा बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली.
शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे खालील लिंक वर क्लिक करून पहा 👇👇👇👇👇
https://drive.google.com/file/d/12VQH3iERW3WO0nGDPhhqTCCU-xpB6sJ-/view?usp=drivesdk