


पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ‘सिंहासन’ला सदिच्छा भेट ; सुपरफास्ट बातम्यांचे केले कौतुक
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सिंहासन न्यूज चॅनलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे नेते उपस्थित होते.
जयकुमार गोरे हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. आपल्या बिझी शेड्युल मधून त्यांनी आवर्जून सिंहासनच्या कार्यालयाला भेट दिली. प्रारंभी त्यांचे संपादक प्रशांत कटारे यांच्यासह कटारे कुटुंबीयांनी औक्षण करून स्वागत केले.
यावेळी पालकमंत्र्यांचा सोलापूरी चादर व टॉवेल बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यालयाची पाहणी करीत त्यांनी सिंहासनच्या बातम्यांचे कौतुक केले.
यावेळी पद्मिनी कटारे, मनिषा कटारे, अतुल गायकवाड, पांडुरंग सुरते, अमोल गायकवाड, अमृत झळके, शशिकांत कटारे, ज्येष्ठ नेते हाजीमलंग नदाफ, पत्रकार मनोज हूलसुरे सामाजिक कार्यकर्ते गुरुशांत मोकाशी, सुनीता गायकवाड, निता सुरते, अनिता गायकवाड, ब्युटिशियन स्नेहा चव्हाण, विक्रम लोखंडे यांच्यासह कुटुंबातील मान्यवर उपस्थित होते.