सोलापुरात बांधकाम व्यवसायिकाला पाच कोटीला फसवले ; उच्चभ्रू कुटुंबावर गुन्हा
सोलापूर : सुमारे चार हेक्टर अविकसित जागा एम ओ यु मधील अटी व शर्ती प्रमाणे विकसित करून घेऊन एम ओ यु मध्ये ठरल्याप्रमाणे 30 टक्के रेशोची रक्कम व रिफंडेबल डिपॉझिट असे सुमारे सव्वा पाच कोटींची बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक झाल्या प्रकरणी एका उच्चभ्रू कुटुंबावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बांधकाम व्यवसायिक अभिषेक सूर्यकांत नवगिरे राहणार मोरारजी पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, दि.02/04/2022 ते दि.20/04/2024 या कालावधी दरम्यान संजय ईश्वरभाई पटेल राहणार गणेश नगर, सम्राट चौक, सोलापूर व त्यांची पत्नी निकीता पटेल, मुलगी उर्वशी पटेल, मुलगा मित पटेल यांनी संगणमत करून, त्यांच्या मालकीची गट नं 14, प्रतापनगर, सोलापूर येथे एकूण 3 हे. 99 आर इतकी अविकसित जागा एमओयु मधील अटी व शर्ती प्रमाणे आमच्याकडून विकसीत करून घेवून, त्यांनी एम.ओ.यु मध्ये ठरल्याप्रमाणे 30 परसेंटज रेशोची रक्कम दिलेली नाही.
याशिवाय आम्ही सदर जागेच्या पोटी रिफंडेबल डिपॉझिट म्हणून 51 लाख रूपये संजय पटेल, निकीता पटेल, उर्वशी पटेल, मित पटेल यांच्या बँक खात्यावर पाठविले. ती रक्कम सुध्दा आजपर्यंत आम्हाला परत दिली नाही. आम्ही आमची 30 टक्के रक्कम 4,75,00,000 रू. व रिफंडेबल डिपॉझिट रक्कम 51,00,000 रूपये अशी एकुण 5,26,00,000 रू. परत मागितले असता त्यांनी ते देण्यास जाणून-बुजून टाळाटाळ करून आमच्या विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केली आहे म्हणून माझी वरील चौघांविरूध्द तक्रार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार तरंगे हे करत आहेत.