सोलापूर : “वो गरीब, अनाथ बच्चो का मसीहा है, वो गरीब और मजबुरो के मदत के लिये खडा है, व सर्वधर्मसमभाव जपता है, कौन है वो? कौन हैं वो? वो है शौकत पठाण.
सोलापुरातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शौकत पठाण तसेच त्यांचे बंधू रसूल पठाण आणि त्यांची मुलं ही सर्वांच्या वाढदिवसाचे व्हिडिओ अतिशय प्रोफेशनल पणे बनवतात. त्या व्हिडिओला एखाद्या चित्रपटाप्रमाणे एडिटिंग केली जाते. यापूर्वी असे बरेच व्हिडिओ पठाण बंधू यांचे पाहण्यात आले आहेत.
शौकत पठाण यांनी यापूर्वी माफिया डॉनचा प्रतीकात्मक व्हिडिओ तयार केला होता परंतु यंदा शौकत पठाण यांनी आपली दाढी वाढवली असून केस हिरो स्टाईलप्रमाणे ठेवले आहेत. त्यांनी आपला वाढदिवस जोरदार साजरा केला परंतु यंदा या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ त्यांनी बनवला असून तो सध्या चर्चेत आहे.
त्या व्हिडिओमध्ये शौकत पठाण यांना गोरगरीब, दिन दलित, सर्वसामान्य, अनाथ मुलांसाठी मदतीला धावणारे व्यक्तिमत्व दाखवण्यात आले आहे. याच व्हिडिओमध्ये एका राजकीय पार्टीची बैठक असते आणि त्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आपणाला सर्वगुण संपन्न असा उमेदवार कोण असेल अशी चर्चा होते. तेव्हा प्रत्येकाच्या तोंडून शौकत पठाण यांचे नाव येते.
हा नक्की व्हिडिओ होता की आगामी होणाऱ्या विधानसभेसाठीची मोर्चे बांधणी? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागला आहे. काँग्रेसच्या शहर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू असून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. जर प्रणिती शिंदे या लोकसभेत विजय झाल्या आणि खासदार झाल्यास शहर मध्य हा मतदारसंघ काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांसाठी रिकामा होतो आणि या मतदारसंघात मुस्लिम समाजाची सर्वाधिक आणि निर्णयक मते आहेत. हा विचार करून तर शौकत पठाण यांनी हा व्हिडिओ तयार केला नसावा अशी चर्चा सुरू झाली आहे. काही का असेना शेवटी चर्चा तर झालीच पाहिजे.