सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वेळेवर न दिल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील सरपंच यांच्यासह इतर सदस्यांचे सदस्य पद रद्द करण्याची कार्यवाही सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली होती. त्या निकालाच्या विरोधात संबंधित सरपंच हे राज्य निवडणूक आयोगाकडे गेले होते त्याठिकाणी सरपंच आणि इतर सदस्यांच्या बाजूने निकाल लागला आहे.
या सर्वांचे सदस्यपद काय ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने केले असून त्याप्रमाणे राज्याच्या निवडणूक आयोगाने तसा आदेशही काढला आहे. यामुळे दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठीही हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. अर्जदार कडून ऍड. मंजुनाथ कक्कलमेली यांनी काम पाहिले.
सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेला खर्च सादर न केल्याने गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्यासह सहा सदस्यांचे सदस्यत्व आशीर्वाद यांनी रद्द केले होते.
यामुळे त्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नव्हती.
सदस्यत्व रद्द झालेले सर्व सहा जण हे आमदार सुभाष देशमुख समर्थक आहेत. सरपंच भीमाशंकर कल्लाप्पा बबलेश्वर, सदस्य स्मिता अशोक मुक्काणे, सोमनिंग धरेप्पा कमळे, संगप्पा काशीराम बिराजदार, युक्ता यतीन शहा, राजश्री उमेश जंगलगी (सर्व रा. भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणात अर्जदार सिद्धेश्वर महादेव कुगणे यांनी सहा जणांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रार अर्ज केला होता. भंडारकवठे ग्रामपंचायतीची २०२१ मध्ये निवडणूक झाली होती.
राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या आदेशात ……..
लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येमुळे ग्रामपंचायत विसर्जित होईल, लोकशाहीचा तिसरा स्तर बळकट करण्याच्या उद्देशाच्या विरोधात जाईल आणि त्यामुळे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही. या परिस्थितीत, आणि अर्जदारांची लोकशाही पद्धतीने निवड झाली आहे आणि तीन महिलांसह काही सदस्य प्रथमच ग्रामपंचायत भंडारकवठे सदस्य म्हणून निवडून आले आहेत, हे लक्षात घेता, त्यांना त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जाणार नाही हे योग्य आणि योग्य आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14-ब (2) राज्य निवडणूक आयोगाला कोणतीही अपात्रता काढून टाकण्याचा किंवा अशा अपात्रतेचा कालावधी कमी करण्याचा अधिकार देते.
10. वर दिलेली कारणे पाहता, जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे दिनांक 12.10.2023 चे आदेश रद्द करून त्यांची अपात्रता काढून टाकण्यासाठी अर्जदारांनी केलेल्या वादाशी मी सहमत आहे आणि खालील आदेश पारित करतो:
या प्रकरणातील सर्व 6 अर्जदारांबाबत जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी दिनांक 12.10.2023 रोजी काढलेला आदेश याद्वारे बाजूला ठेवण्यात आला आहे आणि त्यांचे ग्रामपंचायत भंडारकवठे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, सोलापूर यांना विलंब न करता सदर आदेशाबाबत कळवावे.