सोलापूर पोलिसांचा स्नुफी राज्यात “लय भारी” ; काय आहे अशी कामगिरी
दिनांक 06/12/2024 ते दिनांक 12/12/2024 या कालावधीत 19 वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. सदर स्पर्धेस पोलीस आयुक्तालय, सोलापूर आस्थापनेवरील ” स्नुफी ” या श्वानास घेवून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
या स्पर्धेत श्वान पथक सोलापूर कडील ” स्नुफी “या श्वानाने “वस्तुच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणे व वासावरून गुन्हेगाराला ओळख परेड मध्ये ओळखणे ” या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र राज्यामध्ये व्दितीय क्रमांक पटकाविला आहे.
या श्वानाने गुन्हे शोधकचे प्रशिक्षण श्वान प्रशिक्षण केंद्र पुणे येथे पुर्ण करून दि.२५/१०/२०१९ रोजी दाखल झाले आहे. तेव्हापासून बरेच गुन्हे उघडकिस आणण्यास मदत केली त्यातील काही, उघड केलेल्या घरफोडींच्या गुन्हयांची माहिती खालीलप्रमाणे,
१) MIDC PS/CR No. १९/२०२१ भा.द.वी. कलम ४५४,४५७,३८० श्वानाने ज्वेलरी बॉक्सच्या वासावरून गुन्हेगाराचा शोध लावला.
२) JBPS/CR No. ३९९/२०२१ भा.द.वी. कलम ३०२ श्वानाने चप्पल व दगडाच्या वासावरून आरोपीचे घर दाखविले.
३) नुकताच पार पडलेल्या १९ वा पोलीस कर्तव्या मेळावा २०२४ मध्ये वस्तुच्या वासावरून गुन्हेगारास शोधून आणणे, व वासावरून गुन्हेगाराला ओळख परेडमध्ये दाखविणे यामध्ये श्वानाने माहाराष्ट्र राज्य मध्ये व्दितीय क्रमांक पटकविला आहे.
सदरची उत्कृष्ट कामगिरी राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर मा.डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) व राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली श्वान पथक सोलापूर शहरकडील सफौ/लक्ष्मण साबतेबुवा गणगे, पोह/205 शिवानंद सिद्रामप्पा कलशेट्टी व पोशि/1209 रतन बाबासाहेब गनुरे यांनी केली आहे.