सोलापूर ‘शहर मध्य’साठी एमआयएम तर्फे फारूक शाब्दि यांच्या उमेदवारीची घोषणा
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून महाराष्ट्र राज्यात पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नावाची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अससुद्दिन ओवेसी यांनी केली आहे.
फारूक शाब्दी यांनी शहर मध्य या मतदारसंघातून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते 38 हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. नवखे असतानाही त्यांनी चांगली फाईट दिली होती. आता मागील पाच वर्षात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आता शहर मध्य च्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने शाब्दि यांना या मतदारसंघातून आमदार होण्याची मोठी संधी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाब्दी यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात एम आय एम चा उमेदवार न दिल्याने मुस्लिम समाजातून त्या निर्णयाचे कौतुक झाले होते आणि याचा फायदा काँग्रेसलाही झाला. त्यामुळे मुस्लिम समाजाचा यावेळी आमदार करण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शाब्दि हे योग्य उमेदवार असल्याची चर्चा मुस्लिम समाजातून ऐकण्यास मिळत आहे.