या पठ्ठ्याने अखेर आपला अर्ज मंजूर करून आणलाच ! ना मंजूर झालेले तीन अर्ज झाले मंजूर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाच्या एक दिवस अगोदर उमेदवारी अर्ज छाननी मध्ये नामंजूर करण्यात आलेले तीन अर्ज पणन संचालकाकडे अपील केल्यानंतर मंजूर करण्यात आले आहेत.
यामध्ये यापूर्वी अकरा वर्ष संचालक राहिलेले केदारलिंग विभुते, सिकंदरताज पाटील व सतीश इसापुरे या तिघांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज छाननी वेळी केदार विभुते आणि सिकंदर ताज पाटील या तिघांच्या नावाने बाजार समितीकडे थकबाकी असल्यामुळे यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते तसेच सतीश इसापुरे यांचा गाळा असल्याने ते हितसंबंध जोपासतात त्यामुळे त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केला होता.
या तीनही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात पणन संचालक यांच्याकडे अपील केले होते ते तिघांचेही अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
दरम्यान शासकीय विश्रामगडावर आमदार सचिन कल्याणशेट्टी एक दिवसभर थांबून होते आपला अर्ज मंजूर झाल्याचे समजताच विभुते यांनी त्यांच्या पॅनल मध्ये जाण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावल्याचे दिवसभरातील घडामोडीवरून पाहायला मिळाले.