सोलापूर व माढा मतदारसंघाची मतमोजणी अशी होणार ; दुपारी तीन पर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
सोलापूर : आता फक्त लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर राखीव आणि माढा मतदारसंघाच्या मतमोजणीत कोण विजय होणार याची एकच चर्चा असून मंगळवारी हे चित्र आता स्पष्ट होणार आहे.
लोकसभेच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्जा असून सोलापुरातील रामवाडी गोडाऊन मध्ये हे मतमोजणी पार पडणार आहे. सोलापूर साठी बारा लाख 1586 इतकी मते मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल मतांची संख्या 3511 आहे.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा लाख 67 हजार 530 तर पोस्टल मतदान 6971 एवढी मते मोजली जाणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ व शहर उत्तर, शहर मध्य व अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर व पंढरपूर असे दोन तालुके एकाच हॉलमध्ये 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मोहोळ 24, शहर उत्तर 20, शहर मध्य 27, अक्कलकोट 27, दक्षिण 26 पंढरपूर 25 इतक्या फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल.
माढा मतदारसंघासाठी करमाळा व माढा, सांगोला व माळशिरस, फलटण व माण हे एकाच हॉलमध्ये 14 टेबलवर मतमोजणी होईल. करमाळा 25, माढा 25, सांगोला 22, माळशिरस 25, फलटण 25 माण 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.