सोलापूर : पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस सिलेंडर दरवाढ, महागाई विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात मागील दोन दिवसांपासून राज्यात साखळी पद्धतीने आंदोलन सुरू आहेत सोलापुरात मंगळवारी सोलापूर मंगळवेढा रोड वर देगाव नाक्याजवळ काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर दुचाकी टाकून यावेळी
पेट्रोल डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, गॅस सिलेंडर दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल डिझेल दर कमी झाले पाहिजे, गॅस सिलेंडर वाढ रद्द झालीच पाहिजे,अशी घोषणाबाजी करण्यात आली….
दरम्यान शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, देशातील पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ रद्द करावी अशी मागणी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला…
या आंदोलनात प्रदेश सचिव किसन मेकाले, ज्येष्ठ नेते एन के क्षीरसागर ,माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, मीडिया सेलचे अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, रॉकी बंगाळे, नूरअहंमद नालवार, नितीन वाघमोडे, सर्जेराव पगारे, अजय नागमोडे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.


















