सोलापूर : राज्य सरकारच्या उत्कृष्ट पोलीस ठाणे या स्पर्धेत सोलापूर शहर हद्दीतील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पाच बेस्ट पोलीस ठाणे मध्ये नंबर मारला आहे. सोलापूर बरोबर औरंगाबाद, यवतमाळ, अहमदनगर व जालना या जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
सन २०१६ मध्ये झालेल्या DGP / IGP कॉन्फरन्समध्ये, निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलीस टाण्यांची (Best Police Station) निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला असून त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकार, गृह मंत्रालयाकडून करण्यात येते.
२ यास्तव सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कार्मागरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयांचा तपास, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी / अंमलदार ना प्रोत्साहित करणे, इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट ५ पोलीस ठाण्यांची निवड करुन सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्याची बाब या कार्यालयाच्या विचाराधीन होती..
३. त्या अनुषंगाने राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेकरीता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली इ. बाबी बारकाईने विचारात घेवून घटकातील सर्व पोलीस मूल्यमापन करून त्यापैकी २ उत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती, तसेच परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक / पोलीस आयुक्त यांनी घटक निहाय / परिमंडळ निहाय प्राप्त प्रत्येको २ पोलीस ठाण्यांमधून परिक्षेत्र / आयुक्तालय स्तरावर उत्कृष्ट २ पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी परिक्षेत्रीय स्तरावर समिती, आणि परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमधून ५ सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी राज्य स्तरावर समिती समित्या गठीत करण्यात आल्या होत्या.
एकंदरीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमधून खालीलप्रमाणे क्रमनिहाय सर्वोत्कृष्ट ५ पोलीस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केलेली असून सदर
५ पोलीस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून घोषित करण्यात येत आहे.
१) वाकुंज पोलीस ठाणे (औरंगाबाद शहर)
२) बाभुळगाव पोलीस ठाणे (यवतमाळ)
३) सेवली पोलीस ठाणे (जालना)
४) जोडभावी पोलीस ठाणे (सोलापूर शहर)
५) राजूर पोलीस ठाणे (अहमदनगर)















