सोलापूर. : नॉनबेलेबल वॉरट मधील आरोपीस अटक करायला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर चौघांनी हल्ला केल्याची घटना सेटलमेंट भागात घडली.
पोलीस उप निरीक्षक सचिन शिवशंकर मंद्रुपकर, सलगरवस्ती पोलीस स्टेशन सोलापूर शहर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद सिध्दाराम जाधव, राजश्री विनोद जाधव, शारदा अंबादास जाधव, सोमनाथ बजरंग जाधव राहणार सेटलमेंन्ट फ्री कॉलनी नं ०३, डोणगाव रोड, सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
हकीकत अशी की, यातील फिर्यादी मंद्रुपकर हे नॉनबेलेबल वॉरटची बजावणी करण्यास ऑफिसस्टाफसह गेले असता नॉनबेलेबल वॉरट मधील आरोपी विनोद सिध्दाराम जाधव यास ताब्यात घेत असताना आरोपी जाधव याने आरडा-ओरडा करून फिर्यादीस व बरोबरचे सहकारी यांना धक्काबुक्की केली तसेच आरोपी राजश्री विनोद जाधव व शारदा अंबादास जाधव यांनी आरडाओरडा करून शिवीगाळी केली तसेच निळा टी शर्ट व काळी पॅट नेसलेल्या आरोपी सोमनाथ बजरंग जाधव याने धक्काबुक्की करून दमदाटी करून विटेचा तुकडा फिर्यादीस जोरात फेकून मारून सरकारी कामात अडथळा केल्याने वरील आरोपी विरूध्द फिर्यादी दाखल केली आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक गंपले या करीत आहेत.


















