Solapur : सोलापूर जिल्हा परिषद यंदाच्या आषाढी वारीत हरित वारी निर्मल वारी हा उपक्रम राबवत आहे. या वारीमध्ये विशेष करून महिला वारकऱ्यांच्या आरोग्याकडे संपूर्ण फोकस करण्यात आलेला आहे.
राज्य महिला आयोगाच्या वतीने केलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग तसेच महिला बालकल्याण विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालय तसेच वारी मार्गावरील गावांमध्ये घरगुती शौचालयांची उपलब्धता करण्यात आली आहे.
त्याचबरोबर पालखीच्या विसावा आणि मुक्काम या ठिकाणी महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशीनद्वारे उपलब्ध करण्यात आले आहेत तसेच स्तनदा मातांसाठी स्तनपान केंद्र उभारण्यात आले आहेत. यावरून पूर्णपणे महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली गेल्याचे चित्र आहे.
दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या सर्व सुविधांची सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले त्या म्हणाल्या…


















