सोलापूर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ प्रारूप आराखडा अंतिम करणेबाबत राज्यस्तर बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती लावली. या बैठकीला आमदार संजय शिंदे, आमदार प्रणिती शिंदे,आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पोलीस आयुक्त हरीश बैजल मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी या प्रमुख अधिकाऱ्याची उपस्थिती होती.
या बैठकीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे खाली आले असता पत्रकारांनी बैठकीची माहिती विचारली त्यावेळी जिल्ह्याला सुमारे 600 कोटी हून अधिक निधी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली,यावेळी पत्रकारांनी निधी कमी नाही का?असा प्रश्न विचारला असता भरणे मामांचा अचानकच पारा चढला मागच्या भाजपच्या काळातला निधी आणि कोरूना सारख्या संकट काळातला निधी पाहता निश्चितच जिल्ह्याला आम्ही जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगतानाच त्यांनी विविध योजनांच्या निधीचा पाढा वाचला पहा हा व्हिडीओ..


















