हे काय ! सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेना प्रवेश पुढे ढकलला ; हे आले कारण समोर
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री, चार वेळा आमदार राहिलेले, अक्कलकोट तालुक्याचे नेते सिद्धाराम म्हेत्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का म्हणला जात आहे.
म्हेत्रे यांच्या प्रवेशासाठी अक्कलकोट मध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. म्हेत्रे यांचा प्रवेश कार्यक्रम येत्या 31 मे रोजी आयोजित करण्यात आला होता.
परंतु मागील काही दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे.
त्याचा परिणाम या प्रवेश कार्यक्रमावर झाला असून हा प्रवेश सोहळा येत्या पाच जून रोजी ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.