श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी
सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी ही श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्व विभाग येथील हेडगेवार पटांगण,दत्त नगर येथे शनिवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य जनकल्याण 151 हवणकुंडीय यज्ञ व पारंपारीक पद्धतीने भव्य शोभा यात्रा आयोजन करण्यात आले असून, स्वामी समाधी मठाचे मुख्य पुजारी धनंजय महाराज यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त राम भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी हेडगेवार पटांगण येथे सायंकाळी 5 वाजता सीताराम कल्याण उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणूगोपाल जिला पंतलू,संजय साळुंखे,संजय होमकर,अक्षय अंजिखाने यांनी दिली.