Tuesday, March 10, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 June 2025
in Ashadhi Wari
0
श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

oplus_2

0
SHARES
297
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

श्री गजानन महाराजांचे भक्तिभावे आगमन, सोलापूर जिल्हा प्रशासनाने केले स्वागत ; जिल्हा परिषदेकडून स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

सोलापूर : ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी सायंकाळी तुळजापूर मार्गे ‘श्रीं’च्या पालखीचे तामलवाडी गाव ओलांडून सोलापूर जिल्हय़ात कसेगावाच्या शिवारात आगमन झाले. जिल्हा परिषदेने यंदा या पालखी सोहळ्याच्या स्वागताचे योग्य नियोजन केल्याचे पाहायला मिळाले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250628-WA0045.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250628-WA0044.mp4

आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे प्रदेश नेते शहाजी पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, त्यांच्या पत्नी सौ. तेजस्विनी जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी कवितके, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, उप अभियंता बीटला, कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, उळे गावचे सरपंच अंबिका कोळी, नेताजी खंडागळे, मनोज गुंड, गंगेवाडी सरपंच प्रशांत जाधव यांच्यासह इतर मान्यवर व अधिकाऱ्यानी पालखीचे स्वागत केले.

या पालखी सोहळय़ात शिस्तीचे व भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले. २६ दिवसांचा पायी प्रवास करीत सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेल्या या पालखी सोहळय़ात पांढऱ्याशुभ्र पोशाखातील ६५० भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय आहे.

श्री गजानन महाराजांच्या नामाचा गजर, वीणा, टाळ-चिपळय़ांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच तल्लीन होऊन ‘श्रीं’च्या दर्शनासाठी पुढे येत होते. अग्रभागी मानाचे अश्व आहे. यानंतर श्री गजानन महाराजांची पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे मुक्कामी रवाना झाली.

Tags: #Sachin kalyanshettyAshadhi EkadashiGajanan Maharaj
SendShareTweetSend
Previous Post

ISCCM सोलापूर शाखेची नवीन कार्यकारिणी बिनविरोध

Next Post

गजानन महाराज पालखीतील वारकरी व भाविकांना केळी वाटप ; प्रशांत गायकवाड मित्र परिवाराचा उपक्रम

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971194
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group