धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे कनिष्ठ लिपिक विशाल उंबरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागातील उत्कृष्ट कर्मचारी आणि कनिष्ठ लिपिक विशाल उंबरे वय 28 यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहीण असा परिवार आहे.
जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागात ते सेवा पुस्तिका पडताळणीचे काम पाहत होते. त्यांच्या पत्नी ब्रह्मदेवदादा माने बँकेत कामास आहेत.
या घटनेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
या निधनाबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सोलापूर, जि प बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर यांच्यावतीने शोक व्यक्त केला जात आहे.