धक्कादायक ! राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन ;सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ
सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे हे महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत तसेच पुतणे देवेंद्र कोठे हे भारतीय जनता पार्टी कडून शहर मध्ये चे आमदार आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आले यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. आमदार होण्याचे स्वप्न तसेच त्यांनी सुरू केलेल्या आयटी पार्कचे स्वप्न अधुरेच राहिले असे म्हणावे लागेल. आयटी पार्क साठी आता कोण पुढाकार घेणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवले. महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते. महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.