शिवसेनेत महिलांची ताकद वाढवणार ; अनिता माळगे यांनी केली सक्षमीकरणाची जोरदार सुरुवात
लाडकी बहिण योजनेनंतर शिवसेना पक्षाकडून महिलांच्या सर्वांगीण विकास करिता महाराष्ट्रात शिवसेना महिला सक्षमीकरण या योजनेची सुरुवात आई महालक्ष्मीच्या कोल्हापूर पावन नागरी पासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सांगली जिल्हा व आत्ता सोलापूर जिल्हयात घेण्यात आल्या. या बैठकीला शिवसेना महिला आघाडीच्या सक्षमीकरण राज्य समन्वयक अनिता माळगे, शीतल म्हेत्रे, प्रियांका परांडे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थिती होत्या.
त्या बैठकीत गाव व शहर पातळीवर महिलांसाठी काम कसे करायचे व विविध शासकीय योजनाची माहिती आणि शासनांनी महिला करिता राबवित असलेल्या योजनांची माहिती व प्रसार करणे तसेच महिलांची शाखा ,महिला शिवदूत व महिला बचत गटाची सक्षम बाधनी करणे व महिलांनी करत असलेल्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध करून देणे व उमेद मॉलच्या माध्यमातून महिलांच्या हक्काचे प्रती जिल्हा एक उमेद मॉल उभारणी करणे तसेच नाबार्ड, कृषी विभाग, आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र, उमेद, माहीम, स्मार्ट प्रकल्प, मॅग्नेट प्रकल्प, महामंडळ तसेच केंद्र व राज्याच्या विविध योजना तळागाळात पोहचवून महिलांना सर्वांगीण विकासाच्या दुष्टीने शिवसेनेचे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.
यावेळी राज्य समन्वयक अनिता माळगे यांनी राजकीय व सामाजिकदृष्ट्या गावपातळीवर काम कसे करायचे या विषयी मार्गदर्शन केले .पक्षाच्या महिला नेत्यांना अधिक सक्षम व सक्रिय करत राज्यात प्रत्येक बूथ वर महिला कार्यकर्त्यांचे संघटन उभारणे गरजेचे असल्याचे सांगीतले.
महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी पक्ष व सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देणे , विविध शासकीय विभाग, प्रशिक्षण संस्था, सेवाभावी संस्था यांना एकत्रित करून महिलांना रोजगार व तांत्रिक प्रशिक्षण देणे, उद्योग करीत असलेल्या किंवा नव्याने उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या महिलांना शासनाकडून व बँकेकडून आर्थिक भांडवल उपलब्ध करून देणे या करिता शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली अॅप निर्मिती करून महिलांना एका लिंक वर सरळ व सोप्या पद्धतीने माहिती असणार असून महिलांना सर्व योजनेचा माहिती ,अप्लिकेशन फॉर्म ,शासनाच्या ऑनलाईन बेब साईट वर उपलब्द करून देणार असून त्याचा थेट लाभ महिलांना मिळणार आहे.
कार्यक्रमास वर्षा चव्हाण, पूजा चव्हाण, वैशाली हावनूर, निशा ढोकणे, शशिकला कसपटे, अनिता गवळी, रुपारणी चव्हाण, नीता शिंदे, वर्षा म्हेत्रे, अंजना चव्हाण, गौतमी लोंढे, गंगाबाई स्वामी, जयश्री कोलारी व इतर महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती.