Wednesday, April 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘काळजे’ -नि’काळजे’ एकत्र? भाई कुछ तो गडबड है!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
28 December 2025
in political
0
‘काळजे’ -नि’काळजे’ एकत्र?  भाई कुछ तो गडबड है!
0
SHARES
249
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘काळजे’ -नि’काळजे’ एकत्र? भाई कुछ तो गडबड है!

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेक राजकीय घडामोडी शहरात घडत आहेत. अनेक कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. एकीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शनिवारी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन युती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या सोलापुरात काँग्रेसच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हे निवडणूक लढवत आहेत. असे असताना एकनाथ शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जाणारे माजी जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि काँग्रेसचे नगरसेवक, कुमठा नाका परिसरातील आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे हे दोन्ही नेते एकत्र चर्चा करतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रभाग क्रमांक 20 मध्ये यापूर्वी निवडून आलेले निकाळजे हे आता प्रभाग तुटल्याने आणि प्रभाग क्रमांक 21 हा अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाल्याने ते स्वतः ऐवजी आपल्या कन्येला या प्रभागातून काँग्रेस तर्फे उभी करत आहेत. मनीष काळजे हे सुद्धा प्रभाग 21 मध्येच राहतात त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा या प्रभागात पणाला लागली आहे.

या निवडणुकीत आता प्रभाग 21 मध्ये प्रवीण निकाळजे आणि मनीष काळजे एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत पण या दोघांच्या भेटीचा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रवीण निकाळजे हे कुमठा नाका संजय नगर मध्ये राहतात आणि मनीष काळजे हे लक्ष्मी विष्णू सोसायटीमध्ये राहतात त्यामुळे हे एकमेकांच्या जवळ राहणारे नेते आहेत परंतु पक्षाची भूमिका वेगळी आणि मैत्री वेगळी अशा भूमिकेतून यांची सिंहासन कार्यालयाच्या समोर भेट झाली. ते राजकीय चर्चा करत असताना त्यांचा हा फोटो क्लिक करण्यात आला होता.

Tags: BJP vs Shivsena
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सोलापुरात राजकीय खळबळ ; फारूक शाब्दि यांचा एमआयएम शहराध्यक्ष पदासह सदस्यपदाचा राजीनामा

Next Post

फारुख शाब्दी राजीनाम्यावर ठाम; जुबेर बागवान शाब्दिंना NCP त घेण्यात यशस्वी होणार? तो व्हिडिओ बराच सांगून गेला

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1973483
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group