मनीष काळजे भिडले खासदार ओमराजे निंबाळकरांशी ; अन्यथा पुण्याच्या DPC ची पुनरावृत्ती होईल
सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेली जिल्हा नियोजन समितीची सभा चांगलीच आठवणीत राहणारे ठरले आहे. या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख आक्रमक पाहायला मिळाले त्यामध्ये मनीष काळजे आणि चरणराज चवरे यांचा समावेश होता.
सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे डायसवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बाजूला होते. ओमराजे हे वारंवार बोलत असल्याने खाली बसलेल्या सदस्यांना बराच वेळ बोलता येईना हे पाहून खाली बसलेले काळजी हे चांगलेच चिडलेले पाहायला मिळाले. जेव्हा मनीष काळजे यांनी सोलापूर महापालिकेच्या अंतर्गत रमाई आवास योजनेचा मुद्दा उपस्थित केला.
गोरगरिबांना घरे पाडण्यास सांगितले जातात परंतु त्यानंतर बरेच महिने त्यांची घरे मंजुर होत नाहीत. हे महापालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक करतात असा मुद्दा उपस्थित करून महानगरपालिकेला धारेवर धरले. तेव्हा महापालिकेचे अधिकाऱ्यांना उत्तरे देता आली नाहीत यावर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी ही या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली.
यानंतर पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान याच वेळेस धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे बोलत असताना मनीष काळजे यांना धारेवर धरण्याची संधी मिळाली. पुण्याची पुनरावृत्ती करू देऊ नका, खासदारांना डीपीडीसी मध्ये बोलण्याचा अधिकार नाही, अजितदादांनी सांगितले आहे. हा नियम इथेही लागू असं मनीष यांनी म्हटल्यामुळे गोंधळ उडाला. पहा काय घडले हा व्हिडिओ…