सोलापूर : आगामी लोकसभेची निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. सोलापुरातील भारतीय जनता पार्टीने आपली मोर्चेबांधणी जोरदार सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यावर पक्षाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणूक पदाची घोषणा केली असून त्यामध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी शहाजी पवार यांची सोलापूर लोकसभा निवडणूक सहप्रमुख पदावर निवड झाली आहे.
शहाजी पवार हे अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीला होणार आहे.