संतोष पवार दक्षिण मध्ये ठेवणार अनेकांना ‘गॅस’वर; वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी जाहीर
दक्षिण सोलापूरचे भूमिपुत्र, मार्ग फाउंडेशन अध्यक्ष संतोष सेवू पवार यांना वंचित बहुजन आघाडी कडून दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते A B फॉर्म देण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, युवा नेते विक्रांत गायकवाड, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव आदी उपस्थित होते.
संतोष पवार यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी मुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. प्रस्थापितांना ते निश्चितच गॅसवर ठेवतील यात शंका नाही.
मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपली मोर्चे बांधणी केली आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे असल्याने ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.