पत्रकार शरीफ सय्यद यांना मातृशोक
दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक शरीफ सय्यद यांच्या मातोश्री सायराबानो चांदसाहेब सय्यद यांचे अल्प आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्ष होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून -नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवार २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर शहरातील मोदी कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा होटगी रोड येथील सहारा नगर -१ येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे.